मुंबई

शरद पवार नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारले. याची माहिती त्यांनी स्वतः ट्‌विटर हॅंडलवरून सोमवारी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यांनी पवार यांची चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी भेट घेऊन स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. ही विनंती स्वीकारत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

शरद पवार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्‍वस्तही आहेत. त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारल्यामुळे 100 व्या नाट्यसंमेलनाला अधिक बळ आले आहे, अशी भावना नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केली. नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन (27 मार्च, सांगली) आणि समारोप (14 जून, मुंबई) या दोन्ही कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. राज्यभरातील कार्यक्रमांची आखणी सुरू असल्याने स्वागताध्यक्ष इतर कोणत्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील याची माहिती लवकरच देण्यात येईल, असेही कांबळी म्हणाले. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्यांनी सोमवारी मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचीही भेट घेतली. देशमुख उद्‌घाटन आणि समारोपाला उपस्थित राहतील का, याबद्दल सध्या काही सांगता येत नाही, असेही नाट्य परिषदेकडून सांगण्यात आले. सोमवारच्या भेटीत अनुदानाबद्दल चर्चा झाली नाही. कार्यक्रमांची आखणी झाल्यानंतर अनुदानासाठी अर्ज करण्यात येईल, असे नाट्य परिषदेने स्पष्ट केले आहे. 

"समस्या पोहोचतील' 

आगामी काळात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचीही भेट घेण्यात येईल. यंदाचे नाट्यसंमेलन राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे आमदार नाट्यचळवळीशी जोडले जाऊन स्थानिक कलावंतांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील, अशी आशा नाट्य परिषदेने व्यक्त केली आहे.

Web title : Sharad Pawar will be President of natyasamelana

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT